December 13, 2025 12:09 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री मोदी सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून येत्या 15 ते 16 डिसेंबर दरम्यान जॉर्डनला भेट देतील. भारत हा जॉर्डनचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तर 16 ते 18 डिसेंबर दरम्यान मोदी आधी  इथिओपियाला आणि नंतर ओमानला भेट देणार आहेत.