December 3, 2025 12:32 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्र्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाचं नामकरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाचं नामकरण सेवा तीर्थ असं करण्यात आलं आहे. तसंच राजभवन आणि राजनिवास यांची नावं लोकभवन आणि लोकनिवास अशी करण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रवासात हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं शहा म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सत्तेचं नाही तर सेवेचं प्रतीक असून प्रधानमंत्री स्वतःला सेवक म्हणवून घेतात असं ते म्हणाले.