व्हायब्रन्ट व्हीलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं आयुष्य सुलभ झालं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर इथं सुमारे ५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली , त्या वेळी ते बोलत होते. अरुणाचल प्रदेशाचा विकास म्हणजे भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारमुळे मिळणाऱ्या दुहेरी लाभांचं उदाहरण आहे असंही ते म्हणाले. ईशान्येकडील राज्ये देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनत आहेत , असं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्र्यांनी आज इटानगर इथं २ मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची आणि १० पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.