प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटरूपाने मिळालेल्या १ हजार ३०० हून अधिक वस्तूंचा आजपासून ऑन लाईन पद्धतीनं लिलाव सुरू झाला. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं याबाबत माहिती दिली. या लिलावातून उपलब्ध होणार निधी नमामी गंगे सारख्या सरकारी योजना राबवण्यासाठी खर्च केला जाणार आहे. यापूर्वी केलेल्या अशा प्रकारच्या लिलावांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला असल्याचंही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Site Admin | September 16, 2025 8:55 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव
