डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. बिहारमधल्या गया इथं ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसंच गया ते दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस गाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील.  ६ हजार ८८० कोटींच्या ६६० मेगावॅट बक्सर औष्णिक विद्युत केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्री करतील. तसंच ते १२६० कोटींच्या शहरी विकास प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत.