प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २२ तारखेला बिहारमध्ये गया इथं औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात पाटणा जिल्ह्यातल्या मोकामा आणि बेगुसराय यांना जोडणाऱ्या गंगेवरच्या पुलाचा समावेश आहे. हा पूल जुन्या रेल्वे आणि रस्ता वाहतुसाठी उभारलेल्या राजेंद्र सेतू या पुलाला समांतर असेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. हा नवीन पूल उत्तर बिहार आणि दक्षिण बिहारच्या जिल्ह्यांमधल्या वाहतुकीचं अंतर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या २०१७मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.
Site Admin | August 20, 2025 1:10 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री मोदी बिहारमध्ये औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार