प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-२ यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ५ हजार ३६० कोटी रुपये खर्चाच्या द्वारका द्रुतगती मार्गामुळे यशोभुमी,डीएमआरसी ब्ल्यू लाईन आणि ऑरेंज लाईन, बिजवासन रेल्वेस्थानक, द्वारका क्लस्टर बस डेपो जोडले जाणार आहेत. शहरी विस्तार रस्ता-२ मुळे दिल्लीमधला आणि बाह्य रिंगरोड, मुकरबा चौक, राष्ट्रीय महामार्ग ९, धौला कुआं इथली वाहतूक सुरळित होईल.
दरम्यान, उद्घाटना आधी प्रधानमंत्र्यांनी प्रकल्पाचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला.