प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ निवासस्थानांचं उदघाटन होणार आहे. बाबा खरक सिंह मार्गावरच्या या संकुलात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सिंदूर वृक्षाचं रोपही लावलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने सांभाळता यावी, या दृष्टीनं या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Site Admin | August 10, 2025 2:03 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संसद सदस्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांचं उद्घाटन होणार