प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंती उत्सवात सहभागी झाले. सांस्कृतिक मंत्रालयाने आदि तिरुवतीराई महोत्सवाच्या माध्यमातून चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला हा महोत्सव आज संपन्न होत आहे. गंगाईकोंडा चोलापुरम ही जवळजवळ अडीचशे वर्ष चोल साम्राज्याची राजधानी होती. आदि तिरुवतीराई महोत्सव २०२५, राजेंद्र चोल प्रथम यांचा चिरस्थायी वारसा आणि चोल राजवंशाच्या तेजस्वी संस्कृतीला मानवंदना देतो.
Site Admin | July 27, 2025 2:50 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री तमिळनाडूत आदि तिरुवतीराई महोत्सवात सहभागी