प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान भारत आणि इंग्लंड धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर चर्चा होणार आहे. ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार कराराला औपचारिक रुप देण्यात येईल.
प्रधानमंत्री मोदी काल दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी लंडनला पोहोचले तेव्हा रंगीबेरंगी पोषाखातल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात लंडनमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. ही भेट दोन्ही राष्ट्रांमध्ये आर्थिक भागीदारी वाढवण्यात महत्त्वाची ठरेल. समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणं, यावर लक्ष केंद्रीत असेल, जागतिक प्रगतीसाठी भारत-ब्रिटनची मजबूत मैत्री आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.