प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं.
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २६ जुलैला मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. या भेटीत प्रधानमंत्री मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जु यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत, असं मिस्री यांनी सांगितलं.