देशातली पूर्वेकडची राज्यं प्रगतीपथावर असून पूर्व भारताच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मोतिहारी इथं सात हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
२१व्या शतकात जग वेगाने पुढे जातंय. ज्या प्रमाणे देशाच्या पश्चिम भागात मुंबई प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे येत्या काळात मोतिहारी देखील प्रसिद्ध असेल, असा आपल्याला विश्वास वाटतो. असं प्रधानमंत्री यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
यानंतर पश्चिम बंगालमध्ये दूर्गापूर इथंही पाच हजार कोटीहून अधिक खर्चाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.