महात्मा गांधी आणि महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या घटनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. 12 मार्च 1925 रोजी शिवगिरी मठात महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरू यांच्यात ही ऐतिहासिक चर्चा झाली होती. सत्याग्रह, धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता निर्मूलन, दलितांचं उत्थान अशा विविध विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. भारताच्या मूल्याधिष्ठित समाज रचनेला आकार देणाऱ्या दूरदर्शी संवादाचं स्मरण करण्यासाठी आणि त्यावर चिंतन करण्यासाठी अनेक आध्यात्मिक नेते आणि इतर प्रतिनिधी या समारंभात सहभागी होणार आहेत.
Site Admin | June 24, 2025 10:39 AM | PM Narendra Modi
महात्मा गांधी आणि श्रीनारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन