प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये ६९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज इथं त्यांच्या हस्ते ४८ हजार ५२० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात येईल. प्रधानमंत्री या दौऱ्यात ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे मार्गांशी संबंधित विविध प्रकल्पांचंही उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी ते उत्तरप्रदेशात कानपूर नगर इथं जवळपास २० हजार ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं अनावरण करतील.
Site Admin | May 30, 2025 10:17 AM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री उत्तरप्रदेश, बिहारमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन करणार