डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 29, 2025 10:05 AM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार या तीन राज्यांच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. सिक्कीममध्ये, प्रधानमंत्री मोदी आज सकाळी गंगटोकमध्ये ‘सिक्कीम@फिफ्टी’ या सिक्कीम राज्याच्या राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

सिक्कीमचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नामची इथं ७५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज दुपारी अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. तर बिहारमध्ये आज संध्याकाळी पाटणा विमानतळाच्या नव्यानं बांधलेल्या प्रवासी टर्मिनलचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.