प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात, दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी सुरत, नवसारी आणि दमणमधल्या सिल्वासा इथं विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी दोन वाजता दादरा, नगर हवेली आणि दमण इथं २ हजार ५८७ कोटी मूल्यांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तसंच सिल्वासा इथं जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर सुरतमध्ये सुरत अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेचा शुभारंभ करतील. सुरतमधील दोन लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारीमध्ये होणाऱ्या लखपती दीदी संमेलनाला मोदी उपस्थिती लावणार आहेत. यावेळी २५ हजाराहून अधिक बचत गटांमधील अडीच लाख महिलांना साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक मदत वितरित करतील.
Site Admin | March 7, 2025 12:55 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री दोन दिवसांच्या गुजरात, दीव, दमण दौऱ्यावर
