प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलगरी इथं पोहोचले. कनानास्किस इथं आयोजित G-7 शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत. ऊर्जा संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल. प्रधानमंत्री मोदी सहाव्यांदा G-7 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर नेत्यांबरोबर प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करतील. भारत आणि कॅनडाचे संबंध वृद्धिंगत करणं हा या भेटीचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी उद्या क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथं पोहचतील.
Site Admin | June 17, 2025 8:11 PM | G-7 Summit | PM Narendra Modi
प्रधानमंत्री मोदी कॅनडामध्ये कनानास्किस इथं होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार
