प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या भेटीवर आहे. आज आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी ते जामनगर आणि सोमनाथ येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. आज सकाळी त्यांनी जामनगर जिल्ह्यातल्या वनतारा या प्राण्यांच्या संरक्षण, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राला भेट दिली. त्यांनी सोमनाथ मंदिरात पूजाही केली. त्यानंतर संध्याकाळी ते सासण गीर इथं पोहचले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सोमनाथ मंदिर ट्रस्टची बैठक होत आहे. प्रधानमंत्री या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
प्रधानमंत्री उद्या सकाळी गीर राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी करणार आहेत. हे राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहांचे शेवटचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. या भेटीत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सासण इथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची ७ वी बैठक होणार आहेत.