डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या ९ व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील.  ‘विकसित भारत @ २०४७’, ही यंदाच्या बैठकीची संकल्पना आहे. 

 

केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सहभागात्मक प्रशासन आणि सहयोगाला चालना देण्याबरोबर, ग्रामीण आणि शहरी भागातल्या जनतेच्या जीवनाचा दर्जा सुधारणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्वाच्या असलेल्या राज्यांच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होईल. भारतीय अर्थव्यवस्था जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगानं प्रवास करत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.