April 6, 2025 12:53 PM

printer

प्रधानमंत्री आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘माहो ओमंथाई’ रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते आज माहो ओमंथाई रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापुरा मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकाचंही अनावरण केलं. हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे श्रीलंकेचा उत्तरेकडचा भाग आणि कोलंबो दरम्यान सुरळीत, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे सेवेची सुनिश्चिती होणार आहे.  

 

त्याआधी दोन्ही नेत्यांनी जय श्री महाबोधी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. प्रधानमंत्री आज आपला श्रीलंकेचा तीन दिवसांचा दौरा आटोपून, तमीळनाडूतल्या मंडपमसाठी रवाना झाले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीदरम्यान सद्भावनेचं प्रतीक म्हणून श्रीलंकेनं १४ भारतीय मच्छिमांरांची सुटका केली आहे.

 

श्रीलंकेचा दौरा आटोपून तामीळनाडूत पोहोचल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तामिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन होणार आहे. या सागरी पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च आला असून, वेल्डिंगच्या सांध्याचे जोडणीतंत्र वापरून हा पुल उभारला आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ८ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री रामेश्वरम-तांबरम एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवतील, यावेळी ते रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.