प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. द्विपक्षीय संबंधातली प्रगती, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि संपन्नतेसाठी दोन्ही देश कार्यरत राहणार असल्याचही ते म्हणाले.
दरम्यान ट्रम्प यांनी जलद गती गोल्ड कार्ड व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. यानुसार परदेशी नागरिकांना किमान दहा लाख डॉलर्समध्ये अमेरिकेत कायमचं वास्तव्य करण्याचा आणि नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे.