डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जगाच्या विविध भागांमध्ये लवकरच सुरू होणार भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट

जगाच्या विविध भागांमध्ये भारताचे पाच सेमीकंडक्टर प्लांट लवकरच सुरू होणार असून येत्या काही काळात भारतीय बनावटीच्या चिप्स जगाला उपलब्ध होतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. दिल्लीत झालेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेला ते काल संबोधित करत होते.

 

भारताचे स्थान मोबाईल आयातदार ते मोबाईल उत्पादक असे बदललं असून प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीच्या भरपूर संधी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. भारत वेगाने वृद्धिंगत होणारी जगातली पाचवी अर्थव्यवस्था असल्याचे अधोरेखित करुन आणीबाणीच्या काळात भारतीय युगाची चर्चा होत आहे. यावरून भारतानं जागतिक विश्वास संपादन केला असल्याचं दिसून येतं. आर्थिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीत भारत अव्वल असून, जागतिक स्तरावरील रिअल टाईम व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार भारतात होत असल्याचं त्यांनी नमूत केलं. जागतिक नेते आणि आर्थिक तज्ज्ञ भारताच्या वृद्धीबाबत आशावादी असल्याचंही नमूद केलं.