डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल-प्रधानमंत्री

ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा  आवाज बनेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.  ते आज “भारताच्या ज्ञानपरंपरेचा हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून पुनर्शोध” या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय परिषदेचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. ही परिषद काल सुरु झाली. जगात फक्त भारतात एक कोटी हस्तलिखिते आहेत. कित्येक कोटी हस्तलिखिते नाहीशीही झाली आहेत, परंतु उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांवरुन भारताशी समृद्ध ज्ञानपरंपरा लक्षात येते असं मोदी म्हणाले. ही परंपरा अजूनही जिवंत आहे आणि तिच्यातल्या मूल्य आणि संकल्पनांना आकार द्यायला हवा, असं ते म्हणाले. 

भारताचा हस्तलिखितांचा वारसा आणि जागतिक ज्ञानकोशात त्याला मोलाचं स्थान देण्याच्या हेतूनं अनेक अभ्यासक, तंत्रज्ञ आणि इतरही या परिषदेत सहभागी झाले आहेत. प्रधान मंत्र्यांनी यावेळी ग्यान भरतम पोर्टलचं अनावरण केलं.