केरळमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये विविध विकासकामांची  पायाभरणी आणि लोकार्पण केलं. रेल्वे जोडणी, शहरी रोजगार, विज्ञान-तंत्रज्ञान, नागरिककेंद्री सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांशी संबंधित प्रकल्पांचा यात समावेश आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि केंद्र सरकारनं गेल्या ११ वर्षांमध्ये विविध समाजघटकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख केला. यावेळी तीन अमृत भारत रेल्वेगाड्या आणि एका प्रवासी रेल्वेला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसंच पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड्सचं अनावरण आणि एक लाख फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी कर्जांचं वाटपही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. या योजनांविषयी ते म्हणाले…

 

सीएसआयआर टेक्नॉलॉजी हब आणि रेडिओसर्जरी केंद्राची पायाभरणीही मोदी यांनी केली. याशिवाय, पूजाप्पुरा इथल्या मुख्य टपाल कार्यालयाचं उद्घाटन केलं. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी भव्य रोडशो केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.