सॅफरान विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं S A E S I अर्थात सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्विसेस इंडिया सुविधेचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केलं. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ असणारा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारताने नेहमीच गुंतवणूक आणि नवोन्मेषाचं स्वागत केलं असून उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेमुळे जगभरातल्या कंपन्या भारताला गुंतवणुकीसाठी पसंती देतात, भारत गुंतवणूकदारांकडे केवळ गुंतवणूकदार म्हणून न पाहता सह-निर्माता म्हणून पाहतो, जगभरातील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या, असं प्रधानमंत्री म्हणाले. 

 

S A E S I सुविधा हे स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल आहे, यामुळे भारत हे इंजिन देखभाल, दुरुस्ती हब म्हणून उदयाला येईल, असंही प्रधानमंत्र्यांनी नमूूद केलं.