डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ३ परमरुद्र संगणकांचं लोकार्पण

संशोधनातून स्वावलंबन हाच आजचा आपला मंत्र बनला आहे. विज्ञानाचं महत्त्व केवळ शोध आणि विकासातच नाही तर प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. हवामान आणि वातावरण बदलासाठीची उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा असलेल्या पुणे इथल्या तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली तसंच, उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं उद्घाटन त्यांनी दूरदृश्य पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत संगणकीय क्षेत्र तसंच विज्ञान-तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल असून डिजिटल क्रांतीच्या युगात संगणकीय क्षमता हा राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय बनत असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. 

 

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत सुमारे १३० कोटी रुपये किमतीचे आणि स्वदेशी बनावटीचे तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यात आले आहेत. हे सुपर कॉम्प्युटर पुणे, दिल्ली आणि कोलकाता इथे संशोधनासाठी ठेवण्यात आले आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.