डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 9, 2025 9:03 PM

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार

नामिबिया आणि भारत या दोन्ही राष्ट्रामधले संबंध अधिक दृढ केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देऊन आज गौरवण्यात आलं. प्रधानमंत्रांनी याबद्दल नामिबिया सरकारचे आणि तिथल्या नागरिकांचे आभार मानले आहेत. 

 

या पुरस्कारामुळे प्रधानमंत्री मोदी यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या २७ वर गेली असून चालू दौऱ्यातला  हा चौथा पुरस्कार आहे. 

 

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत आज, नामिबिया इथे उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यासंदर्भातला  सामंजस्य करार करण्यात आला. आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सहकार्याच्या सामंजस्य करारावर देखील दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी  CDRI आणि जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये नामिबिया च्या सहभागाबद्दलचं  स्वीकृती पत्र देखील सादर करण्यात आलं . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष  नेटुम्बो नंदी-नदैतवाह यांच्यात राजधानी विंडहोक इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर हा सामंजस्य करार करण्यात आला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा