December 23, 2024 1:34 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केलं. यावेळी त्यांनी उमेदवारांना संबोधित केलं. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला. 

 

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भर्ती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.