डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५१ हजार पेक्षा जास्त युवकांना नियुक्तीपत्राचं वाटप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या  ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. हा रोजगार मेळावा देशभरात ४० ठिकाणी आयोजित केला जात आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रारंभच्या माध्यमातून मूलभूत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी कर्मयोगी पोर्टलवर ऑनलाइन मॉड्युल आणि एक हजार चारशेहून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.