कॅनडामधील कनानास्किस इथं झालेल्या जी-सेव्हन संपर्क शिखर परिषदेच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सेव्हन नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर चर्चा केली. बदलत्या जगात भविष्यातली ऊर्जा सुरक्षितता, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीच्या जी-सेव्हन चर्चेत त्यांनी भाग घेतला. शाश्वत आणि हरित मार्गानं सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि या करता आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैव इंधन आघाडी यासारख्या भारताच्या जागतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली. विकसनशील देशांसमोरची आव्हानं विशद करुन त्यांनी सांगितलं की भारतानं या देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. जी-सेव्हन शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी सलग सहाव्यांदा सहभागी झाले.
कॅनडाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री क्रोएशियाला रवाना झाले.
Site Admin | June 18, 2025 2:27 PM | G7 | प्रधानमंत्री मोदी
प्रधानमंत्री मोदी यांनी G7 नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर केली चर्चा
