प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया इथून मायदेशी परतले. प्रधानमंत्री मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच दौरा होता. त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला.
प्रधानमंत्री मोदी यांनी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेन्कोविच यांच्याशी प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक शांतता, लोकशाही मूल्य, व्यापार, तंत्रज्ञान आणि परस्परांच्या संस्कृतीमध्ये सहकार्य वाढवण्याप्रति सामायिक वचनबद्धतेवर भर दिला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार अधिक दृढ करण्यावर आणि लवचिक, विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करण्यावरही सहमती दर्शवली. परस्पर संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून, दोन्ही देशांनी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा क्रोएशियाचा ऐतिहासिक दौरा मैत्री, सहकार्य आणि सामायिक जागतिक दृष्टिकोनाचा मजबूत संदेश देऊन यशस्वीपणे संपन्न झाला.