प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ नोव्हेंबर पासून छत्तीसगडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या साठाव्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांना राष्ट्रपती पदकांचं वितरण होणार आहे. या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्देश पोलिसांसमोरच्या प्रमुख आव्हानांना सामोरं जाताना झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं आणि विकसित भारतासाठी देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भविष्यकालीन रुपरेषा आखणं हा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | November 27, 2025 1:36 PM | PM Modi
प्रधानमंत्री मोदी येत्या २९ नोव्हेंबरपासून छत्तीसगडच्या दौऱ्यावर