प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाच्या विंडहोकमध्ये पोहोचले आहेत. नामिबियाचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार मंत्री सेल्मा अशिपाला-मुसवी यांनी होसेआ कुटाको आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्वागतासाठी पारंपरिक गरबा नृत्य सादर करण्यात आलं. भारतीय वंशाचे लोकही मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नंदी नैतवाह यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार असून त्यात ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सेवा आणि औषध उद्योग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य विस्तारणावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मोदी नामिबियाचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती दिवंगत डॉ. सॅम नुजोमा यांना श्रद्धांजली अर्पित करणार आहेत तसच नामिबियाच्या संसदेत भाषणही करणार आहेत. प्रधानमंत्र्यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नामिबिया एक विश्वसनीय आफ्रिकन भागीदार असून त्यासोबत भारत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा नामिबियाचा हा दौरा जवळपास तीन दशकांनंतरचा आहे.
Site Admin | July 9, 2025 3:30 PM | Namibia | PM Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नामिबिया इथं पोहोचले