डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 3, 2025 1:38 PM

printer

प्रधानमंत्री आणि अंगोलाचे अध्यक्ष यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोंकाल्विस लॉरेन्को यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा सुरु आहे. विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. अंगोलाचे अध्यक्ष लॉरेंको काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले असून विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. अंगोलाच्या अध्यक्षांसोबत अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योगपति आणि माध्यमांचे प्रतिनिधींचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे.

 

लॉरेन्को यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहुण्यांच्या  सन्मानार्थ आज राष्ट्रपती भवनात आयोजित केली आहे.

 

अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष 38 वर्षांनंतर भारत भेटीवर आले  आहेत. भारत आणि अंगोला यावर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 40 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.राष्ट्राध्यक्ष लॉरेन्को उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका व्यवसायिक कार्यक्रमात सहभागी होतील. भारत आणि अंगोला दरम्यानचा व्यापार सातत्याने वाढत असून 2023-24 दरम्यान 4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देश सोबत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा