डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारत हे प्रत्येक सर्व देशवासियांचं ध्येय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित  भारत २०४७ हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय असून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारं महत्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या ९ व्या बैठकीत ते आज बोलत होते. हे दशक तांत्रिक, भौगोलिक, राजकीय बदलाचं तसचं नवी संधी उपलब्ध करणारं असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतानं या संधीचा वापर करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक वाढवायला हवी असंही ते म्हणाले.  या वर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य ‘विकसित भारत २०४७’ असून त्याच्या ध्येय धोरणांच्या मसुद्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित आहेत.