प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं. यावेळी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश सिंग झिंडा उपस्थित होते.
त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचंही आज उद्घाटन केलं. तसंच श्रीमद्भगवत गीतेच्या उगमाशी संबंधित ब्रह्मसरोवर इथं पूजा केली. गुरू तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.