डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री आणि आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या भेटीविषयी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असं मोदी म्हणाले.

 

या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या. पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, मेट्रो सेवेचं जाळं विस्तारण्यासाठी, शहरातल्या सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँक १० अब्ज डॉलर्सच्या निधीची तरतूद करेल, असं अध्यक्ष मसातो कांडा यावेळी म्हणाले.