मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्त्वाचा शेजारी देश असून आफ्रिकी खंडांचं प्रवेशद्वार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या मॉरिशस दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज केलं. भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश इतिहास, भूगोल आणि संस्कृतीने जोडलेले असून परस्परांवरचा दृढ विश्वास, लोकशाही मूल्यांवरची सामायिक श्रद्धा आणि विविधतेला दिलेलं महत्त्व ही या दोन्ही देशांची बलस्थानं आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मॉरिशसच्या प्रशासकांची भेट घ्यायला आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं आहे.
Site Admin | March 10, 2025 8:36 PM
मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्त्वाचा शेजारी देश-प्रधानमंत्री
