प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल चार राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन हजार 458 मेगावॅट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवादही साधला.
देशात सौर उर्जेवर चालणारे कृषीपंप बसवण्यात राज्याचा प्रथम क्रमांक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळं शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे. मागेल त्याला कृषी पंप दिले जात असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.