डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या २०व्या हप्त्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरण

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. प्रधानमंत्री उद्या उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यावर असतील. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नऊ कोटी 70 लाख शेतकऱ्यांना 20 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल. उत्तर प्रदेशातल्या 2000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.