प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्याने अशा लाभार्थ्यांचे लाभ तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यात ४३ संशयित लाभार्थी असून या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
Site Admin | December 5, 2025 7:36 PM | PM Kisan Samman Nidhi Yojana
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू