सेवा पर्व या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेविषयी

देशाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. याची सुरवात २४ फेब्रुवारी २०१९ पासून झाली. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते….
होल्ड बाईट मोदी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातल्या सर्वात मोठ्या कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. असे वर्षभरात सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात. या योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामधे तीन लाख ९० हजार कोटी रुपये जमा झाले असून शेतकऱ्यांच्या जगण्यात सकारात्मक बदल झाला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.