नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन झालं. सेंट्रल व्हिस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार करून कर्तव्य भवनाची तिसरी इमारत उभारण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि गतीमानता आणण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या केंद्रिय सचिवालयांच्या इमारतींमधली ही पहिली इमारत आहे. या इमारतीत गृह, परराष्ट्र व्यवहार, ग्रामीण विकास, एमएसएमइ, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या काही प्रमुख मंत्रालयांची कार्यालयं असतील. दरम्यान, यानिमित्त आज संध्याकाळी साडे सहा वाजता आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री उपस्थितांना संबोधित करतील.