प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. ते भावनगर इथं समुद्रक्षेत्राशी संबंधित ‘समुद्र से समृद्धी’ या कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये सागरी प्रकल्प, एलएनजी पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, महामार्ग, आरोग्यसेवा आणि शहरी वाहतूक यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.
मुंबईतील नवीन क्रूझ टर्मिनल, कोलकाता आणि पारादीप इथं बंदरांवर नवीन कंटेनर सुविधा आणि दीनदयाळ बंदरावर हरित जैव मिथेनॉल प्रकल्पांचा यात समावेश आहे.