हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या पूर स्थितीचा तसंच मदत कार्यांचा सविस्तर आढावा घेण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर आहेत.
हिमाचल प्रदेशातल्या आपद्ग्रस्त भागाची त्यांनी हवाई पाहणी केली. धर्मशाला इथे ते राज्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतील. त्यानंतर, पंजाबच्या पूरग्रस्त भागांचीही प्रधानमंत्री हवाई पाहणी करतील.