डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ तारखेला गुजरातच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ तारखेला गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ गुजरातमध्ये टाटा विमान संकुलाचं उद्घाटन करणार आहेत. टाटा ॲडव्हास्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या परिसरात C-295 या लढाऊ विमानाचं उत्पादन करण्यासाठी हे संकुल विकसित करण्यात आलं आहे.  भारतात लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठीचा हा पहिला खाजगी क्षेत्रातला उपक्रम आहे.  त्याचबरोबर प्रधानमंत्री भारत माता सरोवराचं उद्घाटन तसंच अमरेली इथल्या चार हजार ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीदेखील करणार  आहेत. या प्रकल्पांमुळे गुजरातमधल्या विविध जिल्ह्यांतल्या नागरिकांचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर ते दोन हजार ८०० कोटी रूपयाच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसंच त्यांच्या हस्ते अकराशे कोटी रूपयांच्या भूज नलिया रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही होईल. अमरेली जिल्हयातल्या पाणीपुरवठा विभागाच्या ७०० हून अधिक रुपयांच्या विकासप्रकल्पांचं उद्घाटनही ते करतील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.