प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नेटवर्क प्लॅनिंग ग्रूपची बैठक बोलावली होती. लॉजिस्टिक्स, उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सहसचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या रस्ते प्रकल्पांचं आणि दोन रेल्वे प्रकल्पांचं मूल्यमापन बैठकीत झालं. महाराष्ट्रात जुना पुणे नाक्यापासून ते राष्ट्रीय महामार्ग ६५वर सोलापुरातल्या बोरामणि नाक्यापर्यंत चारपदरी उन्नत कॉरिडॉर बांधण्याचा प्रस्ताव रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं दिला आहे. हा मार्ग तयार झाला की परिसरातली वाहतूक कोंडी कमी होणार आहे, प्रवासाला कमी वेळ लागणार आहे. हा प्रकल्प भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग असून त्यामुळे या भागातल्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होणार आहे.