October 13, 2025 2:52 PM | PM GatiShakti

printer

प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्षं पूर्ण

वाहतुकीच्या बहुस्तरीय  जोडणीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. विविध आर्थिक क्षेत्रांना बहुस्तरीय वाहतूक जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १३ ऑक्टोबर २०२१ ला या योजनेचं उद्घाटन केलं होतं.

 

 लोकांना प्रवास करणं सुलभ व्हावं, वस्तू आणि सेवांची वाहतूक विनासायास व्हावी तसंच प्रवासाचा वेळ कमी व्हावा हे याचं उद्दिष्ट होतं. गतीशक्ती योजनेमुळे ५७ केंद्रीय मंत्रालयं तसंच राज्यं  आणि केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित आणलं गेलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.