प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या २०व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ग्लोबल साउथमध्ये होणारी ही सलग चौथी जी-20 शिखर परिषद आहे.
या परिषदेत प्रधानमंत्री मोदी जी-20 कार्यक्रमपत्रिकेबाबत भारताची भूमिका मांडतील, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने तिथं आलेल्या जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्र्यांच्या द्विपक्षीय बैठका होतील. दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही सहभागी होतील, असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.