डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिसमधे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवतील. व्यापक जनहिताच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून जगातल्या विविध राष्ट्रांचे नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख त्यात सहभागी होणार आहेत.

 

याखेरीज फ्रान्स आणि भारताचे धोरणात्मक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं मॅक्रॉन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी प्रयाणापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मार्सेली इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन ते करणार असून तिथं आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुभट्टीलाही ते भेट देतील.

 

फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री अमेरिकेला जाणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रंप यांच्या पुनरागमनानंतरच्या या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.